Chhaava Film : ‘मी आता खरं बोलणार आहे, छावा फिल्म वाईट अन्…’, ‘छावा’तल्या मराठमोळ्या अभिनेत्याचाच काही दृश्यांवर आक्षेप
आस्ताद काळे याने फेसबुकवर एक पोस्ट करत छावा सिनेमात खटकलेले काही मुद्दे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बघा काय म्हणाला आस्ताद काळे ?
छावा सिनेमात अभिनय केलेल्या मराठी अभिनेत्याचाच छावा सिनेमातील काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. छावा सिनेमात काम केलेला अभिनेता आस्ताद काळे याच्याकडून फेसबुकवर यासंदर्भात एक पोस्ट करण्यात आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेता आस्ताद काळे म्हणाला, ‘औरंगजेबाचं वय आणि आजरपण बघता तो या वेगानं चालू शकेल का? सोयराबाई राणींचे अंत्यसंस्कार एका नदीकाठी कसे केले?’ पुढे तो असेही म्हणाला, “मी आता खरं बोलणार आहे. ‘छावा’ वाईट सिनेमा आहे. सिनेमा म्हणून वाईट आहे. इतिहास म्हणून बघायला गेलात तरी problematic आहे. सर्वतोपरी वाईट आहे”. असं आस्ताद काळेनं म्हटलंय. इतकंच नाहीतर त्याने पुढे म्हटलं की, “हा कुठला इतिहास आहे? महाराणी सोयराबाई सरकारांनी छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाच्या मुलाला पत्र पाठवलं होतं?. काय पुरावे आहेत याचे?”, असा सवालही त्याने केला. त्याने पोस्टच्या शेवटी असेही लिहिलंय की, जे सत्य आहे, ते सांगणं गरजेचं आहे, मग ते कोणालाही त्रासदायक का ठरू नये, या सडेतोड घेतलेल्या भूमिकेमुळे अस्ताद काळे सध्या चांगलाच चर्चेत आल्याचे पाहायला मिळतंय.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

