Devendra Fadnavis | मराठीच्या सक्तीवरून मनसे-शिंदे गटाची जुंपली, भैय्यांना हिसका; मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया काय?
मुंबईसह महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्ती करण्याच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विविध पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, हा मुद्दा आता राजकीय वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला असून, 1 मेपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्ती करण्याच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विविध पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, हा मुद्दा आता राजकीय वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला असून, 1 मेपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने आक्रमक भूमिका घेत या निर्णयाच्या समर्थनार्थ इशारा दिला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, “मुंबई आणि महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरणं चुकीचं नाही.” तसेच, ज्या रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी येत नाही, त्यांना मराठी शिकवण्याची तयारी सरकारकडून असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य देणं हे स्वाभाविक आहे. मात्र, या मुद्द्यावरून अनावश्यक वाद निर्माण होऊ नये,” असं सांगत सरकारची भूमिका शांततेची असल्याचंही फडणवीस यांनी अधोरेखित केलं.
या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून, पुढील काही दिवसांत या मुद्द्यावरून संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: Apr 25, 2026 10:13 AM
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...

