tv9 Marathi Special Report | मराठी सक्तीवरून मुंबईत राजकारण तापलं; करुणा मुंडेंचा मराठी माणसालाच इशारा?
ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून राजकारण तापलं आहे. उद्या परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत रिक्षा संघटनांची महत्त्वाची बैठक होणार आहे. मात्र या बैठकीआधीच या मुद्द्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. मराठी सक्तीच्या निर्णयाला विरोध करत करत करूणा मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “गरीब ऑटो चालकांनी रोजीरोटीवर लक्ष द्यावं की मराठी शिकण्यावर?” तसेच “या निर्णयामुळे अर्धी मुंबई रिकामी होईल,” अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान, मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी कठोर भूमिका घेत, “ज्यांना मराठी बोलायचं नाही त्यांनी राज्य सोडावं,” असा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मेपासून मराठी न येणाऱ्या ऑटो-टॅक्सी चालकांचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात ऑटो रिक्षा संघटनांनी 4 मे रोजी बंदचा इशारा दिला असून, त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: Apr 27, 2026 09:57 AM
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..