AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Nirupam Full Press | मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची सरकारकडे पत्राद्वारे मागणी

Sanjay Nirupam Full Press | मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची सरकारकडे पत्राद्वारे मागणी

| Updated on: Apr 27, 2026 | 1:58 PM
Share

रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून राज्यातील राजकारण अधिकच तापले आहे. या मुद्द्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी आता भूमिका घेत, निर्णयाच्या अंमलबजावणीला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. निरुपम यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दुसरे पत्र पाठवत, मराठी भाषेबद्दल आदर व्यक्त केला असला तरी सरसकट सक्ती करण्याऐवजी चालकांच्या परिस्थितीचा विचार करावा, असे नमूद केले आहे.

रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून राज्यातील राजकारण अधिकच तापले आहे. या मुद्द्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी आता भूमिका घेत, निर्णयाच्या अंमलबजावणीला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. निरुपम यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दुसरे पत्र पाठवत, मराठी भाषेबद्दल आदर व्यक्त केला असला तरी सरसकट सक्ती करण्याऐवजी चालकांच्या परिस्थितीचा विचार करावा, असे नमूद केले आहे. अचानक घेतलेल्या निर्णयामुळे कष्टकरी रिक्षा-टॅक्सी चालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
कोणतीही भाषा शिकण्यासाठी वेळ आणि क्षमता आवश्यक असते, असे सांगत निरुपम यांनी स्थलांतरित चालकांना समजून घेण्याची गरज अधोरेखित केली. तसेच, या निर्णयाची अंमलबजावणी किमान सहा महिने ते एक वर्ष पुढे ढकलावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, या मागणीवर सरकार आणि प्रताप सरनाईक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, हजारो चालकांना दिलासा मिळणार की निर्णय कायम राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Published on: Apr 27, 2026 01:43 PM
Follow Us