Video : आताच्या घडीच्या महत्वाच्या बातम्या, सदावर्ते काय म्हणाले?, गृहमंत्री काय म्हणाले?, पाहा…
वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे या केसमध्ये खलबळजनक दावे समोर येत आहे. सध्या गुणरत्न सदावर्तेंचा कोठडी प्रवास मुंबई ते कोल्हापूर, मध्येच मुक्काम सातारा असा झाला आहे. त्यांना बीड पोलीस, आणि सोलापूर पोलीस, आणि पुणे पोलीसही ताब्यात घेण्याची शक्यता आहे. कारण सदावर्तेंवर राज्यातल्या अनेक जिल्ह्यात विविध प्रकरणात गुन्हे दाखल […]
वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे या केसमध्ये खलबळजनक दावे समोर येत आहे. सध्या गुणरत्न सदावर्तेंचा कोठडी प्रवास मुंबई ते कोल्हापूर, मध्येच मुक्काम सातारा असा झाला आहे. त्यांना बीड पोलीस, आणि सोलापूर पोलीस, आणि पुणे पोलीसही ताब्यात घेण्याची शक्यता आहे. कारण सदावर्तेंवर राज्यातल्या अनेक जिल्ह्यात विविध प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे मुंबईत त्यांच्या शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाप्रकरणी (St Worker Protest) युक्तीवाद झाला. या युक्तीवादात सरकारी वकील प्रदीप घरत यांनी काही खळबळजनक दावे केले आहेत. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कोट्यवधी रुपयाला लुटल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यातून अनेक ठिकाणी मालमत्ता घेतल्याचाही आरोप करण्यात आलाय. यात जवळपास 1 कोटी 80 लाखाच्या आसपास सदावर्तेंनी रक्कम गोळा केल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तर दुसरीकडे सदावर्ते यांनी पैसे घेतल्याची कबुली दिल्याचा दावाही केला आहे. ती रक्कम पाहूनही अनेकांचे डोळे पाढरे होतील.
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!

