MNS : ‘तुम मराठी लोग गंदा…’, मुंबईत पुन्हा मराठी माणसाचा अपमान, मनसेचा आरोप काय? घाटकोपरमध्ये नेमकं घडलं काय?
मुंबईतील घाटकोपरमधून गुजराती आणि मराठीचा वाद समोर येताच या वादामध्ये मनसेने उडी घेतली आहे. त्यामुळे या परिसरात वातावरण तापले असताना पोलिस घटनास्थळी दाखल झाली आहे.
मुंबईत पुन्हा एकदा मराठी माणसाचा अपमान झाल्याचा प्रकार घाटकोपर या भागातून समोर आला आहे. गुजराती कुटुंबाकडून मराठी कुटुंबाला अपमानकारक वागणूक दिल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कऱण्यात आला आहे. घाटकोपरमधील एका सोसायटीतील गुजराती कुटुंबियांकडून अपानकारक वागणूक मराठी कुटुंबाला मिळत असल्याचा प्रकार समजताच मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. रात्री मनसैनिकांनी घाटकोपरच्या सोसायटीमध्ये धाव घेतली आणि सोसायटीतील सदस्यांना आपल्या स्टाइलमध्ये समज दिली. यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी मनसे पदाधिराऱ्यांनी इमारतीच्या अध्यक्षाला जाब विचारला तर सोसायटीची अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सोसायटीच्या रहिवाशांनी केली. मासांहार करतात म्हणून मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक दिल्यचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. ‘तुम मराठी लोग गंदा है. तुम मच्छी मटण खाते हो’ असं गुजराती कुटुंबियांकडून मराठी कुटुंबाला सुनावल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. बघा घाटकोपर नेमकं काय घडलं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

