जम्मू काश्मीर : जम्मू स्थित माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कदायक घडली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्यामुळे येथे एकच धावपळ उडाली असून तब्बल 12 जणांचा या चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे. तर 14 भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बचावकार्य सरु आहे.