AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai | Ravi Rana यांना शिवसैनिकांनी दिलं चॅलेंज

| Updated on: Apr 15, 2022 | 7:35 PM
Share

हनुमान चालीसा तर आम्ही वाचतोच, पण तुमच्यासारखे ढोल बडवत नाहीत, असं चोख प्रत्युत्तर किशोरी पेडणेकर यांनी दिलं. एवढंच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत न जाता आमच्यासारख्या शिवसैनिकांशी आधी लढून दाखवा, असं आव्हान रवी राणा यांना पेडणेकर यांनी दिलं.

मुंबई : हिंदुत्वाचा पुरस्कार करत असाल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) उद्या मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचावी, असं आव्हान आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय. रवी राणा यांच्या या आव्हानाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी सडेतोड उत्तर दिलं. तुम्ही आमदार आहात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काय करावं, काय करू नये हे सांगू नका. यांना जनतेच्या मुख्य प्रश्नांना बगल देत फक्त धार्मिक तेढ निर्माण करायची आहे. हनुमान चालीसा तर आम्ही वाचतोच, पण तुमच्यासारखे ढोल बडवत नाहीत, असं चोख प्रत्युत्तर किशोरी पेडणेकर यांनी दिलं. एवढंच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत न जाता आमच्यासारख्या शिवसैनिकांशी आधी लढून दाखवा, असं आव्हान रवी राणा यांना पेडणेकर यांनी दिलं.