VIDEO : Breaking | मातोश्रीवर वरळी, भायखळ्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेमध्ये अनेक मोठा घडामोडी घडत आहेत. याचपार्श्वभूमीवर आता मातोश्रीवर वरळी, भायखळ्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. तर आज इकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेमध्ये अनेक मोठा घडामोडी घडत आहेत. याचपार्श्वभूमीवर आता मातोश्रीवर वरळी, भायखळ्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. तर आज इकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आहे. मंत्रालयात येताच त्यांनी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवसापासून मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारून कामाला सुरुवात केली होती. आज ही केवळ औपचारीकता होती. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून राज्यात भाजपासोबत सत्तास्थापन केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

