Railway Megablock : तिन्ही रेल्वे मार्गावरील प्रवाशांचे ‘मेगा’हाल, कुठं 5 तासांचा जम्बोब्लॉक; चेक करून प्रवास करा
मुंबईकरांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. आज तुम्ही लोकलने प्रवास करणार असाल तर हा व्हिडीओ बघूनच प्रवास करा.
मुंबईतील रेल्वेच्या तिनही मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे, तसेच अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जम्बोब्लॉक
पश्चिम रेल्वेवर आज सकाळी १०:०० ते दुपारी ३:०० या वेळेत पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गांवर हा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान धीम्या मार्गावरील सर्व लोकल गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स ते विद्याविहार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी १०.५५ ते दुपारी ०३.५५ पर्यंत हा ब्लॉक असून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सकडून विद्याविहारला जाणाऱ्या धीम्या गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्यात
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार असून सकाळी ११:०५ ते दुपारी ०४:०५ पर्यंत हा मेगाब्लॉक असेल. पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सकडे सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत कोणत्याही लोकल नसतील.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

