Mumbai Local Mega Block : उद्या लोकलने प्रवास करताय? कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक? जाणून घ्या, मग घराबाहेर पडा…
मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल रविवारी देखील धावत असते. पण तरीही पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी रेल्वे मार्गावर दर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जातो.
उद्या म्हणजेच रविवारी मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करत असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा. जेणेकरून तुमची गैरसोय होणार नाही. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात येत्या रविवार १५ डिसेंबर रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल रविवारी देखील धावत असते. पण तरीही पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी रेल्वे मार्गावर दर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जातो. मुंबई रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर आणि अभियांत्रिकी कामांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मुख्य मार्ग विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर सकाळी ८ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावरील पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट मार्गिका वगळून) अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दुसरीकडे पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे.