Special Report | आठवणीतल्या संगीत क्षेत्रातील लतादीदी
लतादीदींच्या निधन वार्तेने सारा देश शोकाकुल आहे. त्यांच्या गाण्यांनी अनेकांना समृद्ध केलंय. तर कोणाच्या आयुष्याचा अखंड तुकडाच त्यांच्यात गुंतलाय. लतादीदींच्या (Lata Mangeshkar) आवाजाने भल्याभल्यांना मोहिनी घातली.
लतादीदींच्या निधन वार्तेने सारा देश शोकाकुल आहे. त्यांच्या गाण्यांनी अनेकांना समृद्ध केलंय. तर कोणाच्या आयुष्याचा अखंड तुकडाच त्यांच्यात गुंतलाय. लतादीदींच्या (Lata Mangeshkar) आवाजाने भल्याभल्यांना मोहिनी घातली. प्रख्यात साहित्यिक पु. ल. देशपांडे (P.L.Deshpande) यांनी त्यांचा उल्लेख करताना म्हटले होते की, आकाशात सूर्य आहे. चंद्र आहे आणि त्यानंतर फक्त लताचा स्वर आहे. वि. स. खांडेकरांनी कितीतरी वर्षांपूर्वी ‘लता, छे कल्पलता!’ या शीर्षकाचा लेख लिहिला होता. तर सुप्रसिद्ध कवी ग्रेसांनी ‘सांध्यपर्वातील वैष्णवी’मध्ये लतादीदींवर एक मोहक कविता लिहिली.
Published on: Feb 06, 2022 11:01 PM
Latest Videos
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'

