रत्नागिरीत धुवांधार, जूनपासून आत्तापर्यंत पावसाने सव्वा दोन हजार मिलिमीटरची सरासरी ओलांडली
अतिमुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात हाहाकार पहायला मिळाला होता. तर तेथील नद्यांनी आपलं पात्र ओलांडलं होतं. याचदरम्यान रत्नागिरी जिल्ह्याला देखील पावसाने झोडपलं होतं.
रत्नागिरी, 03 ऑगस्ट 2023 | गेल्या आठवड्यात पजलेल्या अतिमुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात हाहाकार पहायला मिळाला होता. तर तेथील नद्यांनी आपलं पात्र ओलांडलं होतं. याचदरम्यान रत्नागिरी जिल्ह्याला देखील पावसाने झोडपलं होतं. त्यानंतर पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. यावेळी हवामान विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस जिल्ह्यात पावसाची रिप रिप होईल. याचदरम्यान सततच्या पावसामुळे रत्नागिरीत जूनपासून आत्तापर्यंत पावसाने सव्वा दोन हजार मिलिमीटरची सरासरी ओलांडली आहे. तर आता देण्यात आलेल्या ऑरेंज अलर्टमुळे खाडीपट्यात पावसाचा जोर अधिक असेल असेही सांगण्यात आले आहे.

