AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार नवनीत राणांची डोकेदुखी वाढणार आता ‘या’ खासदारानं उभं केलं आव्हान

खासदार नवनीत राणांची डोकेदुखी वाढणार आता ‘या’ खासदारानं उभं केलं आव्हान

| Updated on: Jun 26, 2023 | 11:02 AM
Share

तर अमरावती लोकसभेचा खासदार शिवसेनेचाच होणार, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी केला. त्यामुळे नवनीत राणा यांच्यासमोर आधीच इतकी संकंट असतानाच आता त्यांच्याविरोधात एक खासदारच उतरणार आहे. यावरून सध्या अमरावतीत चांगल्याच चर्चा रंगू लागल्या आहेत.

अमरावती : अमरावती लोकसभा मतदार संघ हा युतीसाठी कळीचा मुद्दा ठरला आहे. येथे विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. तर पुढची निवडणूक भाजपच्या पाठिंब्यावर लढणार असल्याचे जाहिर केलं आहे. त्याचदरम्यान प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी देखील अमरावती लोकसभेवर आपला दावा सांगितला. तर अमरावती लोकसभेचा खासदार शिवसेनेचाच होणार, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी केला. त्यामुळे नवनीत राणा यांच्यासमोर आधीच इतकी संकंट असतानाच आता त्यांच्याविरोधात एक खासदारच उतरणार आहे. यावरून सध्या अमरावतीत चांगल्याच चर्चा रंगू लागल्या आहेत. येथे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी परवानगी दिली तर आपण नवनीत राणा यांच्याविरोधात उतरू असे संकेत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी दिले आहेत. त्याचबरोबर त्यांनी सभेत खासदार राणांना मतदान करून काय मिळालं असा सवाल मतदारांना केला आहे.

Published on: Jun 26, 2023 11:01 AM