Nitesh Rane : उद्धव ठाकरेंच्या मुलाची पावसाळ्यात जेलवारी…, डिनो मोरिया प्रकरणी बोलताना नितेश राणेंचं भाकित नेमकं काय?
मुंबईतील मिठी नदीच्या कथित 65 कोटींच्या घोटाळ्यात मनी लॉन्ड्रिंगवरून डिनो मोरियाच्या घरी ईडीकडून छापे टाकण्यात आले. या प्रकरणावरून नितेश राणेंनी मोठं भाकित केलं आहे.
उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलवारी करू शकतो, असं वक्तव्य कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांनी केलंय. अभिनेता डिनो मोरियाच्या घरी काल ईडीने छापे टाकलेत. यावरूनच नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलं आहे. मुंबईतील मिठी नदीच्या कथित 65 कोटींच्या घोटाळ्यात मनी लॉन्ड्रिंगवरून डिनो मोरियाच्या घरी ईडीने धाड टाकली याप्रकरणी सध्या त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळतेय. त्याच पार्श्वभूमीवर नितेश ऱाणेंनी हे वक्तव्य केलं आहे.
‘आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अशी ओळख डिनो मोरियाची आहे. डिनो मोरियावर होणारी कारवाई आणि त्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची चर्चा सुरू आहे. कारण डिनो मोरियाच्या प्रकऱणामुळे उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलवारी करू शकतो.’, असं भाकित नितेश राणेंनी केलंय. इतकंच नाहीतर नितेश राणे पुढे असेही म्हणाले की, डिनो मोरिया हा संध्याकाळी कोणा बरोबर बसायचा उठायचा, त्याचे भावनिक संबंध होते. कदाचित शारिरीक संबंध असू शकतात हे सगळ्यांना माहिती आहे.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

