Special Report | मंत्री छगन भुजबळांनी सांगितला आर्थर रोड जेलचा अनुभव

जेलचं नाव जरी काढलं तरी आर्यन खानच्या अंगावर काटा येत असेल. जेलचा अनुभव कसा असतो? हे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. तर जेलमधून सुटका होण्याआधी जेल प्रशासनाने आर्यनचे उरलेले पैसे परत केले.

जेलचं नाव जरी काढलं तरी आर्यन खानच्या अंगावर काटा येत असेल. जेलचा अनुभव कसा असतो? हे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. तर जेलमधून सुटका होण्याआधी जेल प्रशासनाने आर्यनचे उरलेले पैसे परत केले. आर्यन खानच्या घर वापसीनंतर शाहरुख खान आणि गौरी खानसह संपूर्ण कुटुंब आणि बॉलिवूडमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ‘मन्नत’ रोषणाईने सजली असून, चाहत्यांनी ढोल वाजवून आर्यन खानचे स्वागत केले आहे. आर्यनला तुरुंगातून घरी आणण्यासाठी शाहरुख खानचा अंगरक्षक रवी आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला होता. आर्यन खान सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. चाहते आणि ट्विटर युजर्स आर्यन आणि शाहरुखचे अभिनंदन करत आहेत. यासोबतच आर्यन खानच्या स्वागतासाठी भावनिक आणि आनंदी ट्विटही केले जात आहेत. आर्यन खानला एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. 28 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने आर्यन खानला 14 अटींवर जामीन मंजूर केला होता.

 

 

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI