आजची कॅबिनेट शेवटची, येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागणार? सरकारमधील मंत्र्यानं नेमकं काय म्हटलं?
गुरुवारी घेण्यात आलेल्या राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक निर्णयास मंजुरी देण्यात आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण ८० निर्णय घेण्यात आले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक असण्याची शक्यता ही वर्तविली जात आहे.
राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा मोठा धडाका पाहायला मिळत आहे. राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाच्या निर्णयांना ग्रीन सिग्नल देण्यात आला असून नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह इतर मंत्र्यांच्या उपस्थिती मंत्रिमंडळाची बैठक झाली. या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारकडून तब्बल 80 निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे. अशातच मंत्री गिरीश महाजन यांनी आजची कॅबिनेट बैठक ही शेवटची असून शकते असं वक्तव्य केले आहे. इतकंच नाहीतर येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागू शकते, असा अंदाजही गिरीश महाजन यांनी वर्तविला आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि याच बैठकीत 80 निर्णय घेण्यात आले आहे. बघा काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन?