शिंदेंच्या नेत्याकडे ठाकरेंच्या खासदारांना स्नेहभोजन, जेवणाआधी खासदारांना परवानगीचे आदेश… थेट दिल्या सक्त सूचना
शरद पवारांनी शिंदेंचा सत्कार केल्याने ठाकरे गटाचा संताप झाला. पण त्याच वेळी त्यांचेच खासदार शिंदेंच्या शिवसेनेला स्नेहभोजनाला गेले आहेत. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांनी शिंदेंच्या सेनेच्या स्नेहभोजनाला जाण्याआधी परवानगीच्या सूचना दिलेल्या आहेत.
कुणी कुणाला भेटायचं हे त्या त्या खासदारांनी ठरवावं, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेय. पण खासदारांच्या भेटीत त्यांनी आपल्या खासदारांना शिंदेंच्या शिवसेनेच्या स्नेहभोजनाला जाण्याआधी परवानगी घ्या, अशा कडक सूचना दिल्यात. आता परवानगीची सूचना देण्याची वेळ का आली? तर शिंदेंच्या शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला. त्या स्नेहभोजनाला ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव, नागेश पाटील अष्टेकर आणि भाऊसाहेब वाघचौरे यांनी हजेरी लावली.
आता या स्नेहभोजनाचा टायमिंग सुद्धा खास आहे. शरद पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीमध्ये सत्कार झाल्यानंतर संजय राऊतांनी थयथयाट केला. राऊतांनी आपण पक्षाची भूमिका मांडत असल्याच सांगत शत्रूंचा सन्मान केल्याची टीका करत पवारांकडेच खुलासा करण्याची मागणी केली आणि त्याच रात्री ठाकरे यांचेच तीन खासदार संजय जाधव, नागेश पाटील अष्टेकर आणि भाऊसाहेब वाघचौरे शिंदेंच्या शिवसेनेच्या जेवणाच्या कार्यक्रमाला गेले. पण त्याच वेळी आदित्य ठाकरे यांच्या परवानगी घेण्याच्या वक्तव्यावरून त्यांचेच जेवणासाठी हजर राहिलेले खासदार संजय जाधवांनी पत्रकारांशी अरेरावी केली. जेवणासाठी बोलावलं तर जायचं नाही का? असं संजय जाधव म्हणाले. आता हा आदित्य ठाकरे यांच्या परवानगीच्या वक्तव्याला विरोध आहे की काय? असाही प्रश्न आहे.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल

ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान

सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
