Supriya Sule| विरोधी आमदारांच्या त्या घोषणा आता सुप्रिया सुळे यांच्याही मुखात- tv9
तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटावर टीका करताना, पक्ष फोडून 50 खोके एकदम ओके पेक्षा ते मायबाप जनतेला आणि या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला दिले असते सहा दिवस महाराष्ट्रवर आला नसता असा टोला ही लगावला आहे.
आज मंत्रालयाच्या गेट समोर शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला त्यावरून हे सरकार कुठेतरी कमी पडतय का या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रीया दिली. यावेळी सुळे म्हणाल्या नक्कीच हे आताचे ईडी सरकार असंवेदनशील आहे. या सरकारला पक्ष फोडणे, लोकांना दम देणे हेच जमतं असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच त्या म्हणाल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज विरोधी पक्ष नेते बोलणार होते. तर शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर चर्चा करून या अडचणीच्या काळातून शेतकरी कसा वाचेल. त्यांना जास्तीत जास्त जास्त निधी कसा मिळेल याच्यासाठी आज चर्चा होणार होती. तर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आज काहीतरी मोठ्या पॅकेजच्या घोषणा करतील अशी सगळ्यांचीच आमची अपेक्षा होती. मात्र दुर्दैव या सरकारचं, या सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वासच नसेल त्याच्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सुळे म्हणाल्या. तसेच त्यांनी शिंदे गटावर टीका करताना, पक्ष फोडून 50 खोके एकदम ओके पेक्षा ते मायबाप जनतेला आणि या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला दिले असते सहा दिवस महाराष्ट्रवर आला नसता असा टोला ही लगावला आहे.
Published on: Aug 23, 2022 06:08 PM
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
