Kalyan Crime News : कल्याण अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण; आरोपीने कारागृहात स्वत:ला संपवलं
Taloja Jail : कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपीने तळोजा कारागृहात गळफास लावून स्वत:ला संपवलं आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली होती.
कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने आत्महत्या केली आहे. तळोजा कारागृहात आरोपी विशाल गवळी याने आत्महत्या करून स्वत:ला संपवलं आहे. तळोजा कारागृहात पहाटेच्या सुमारास आरोपीने गळफास घेतला. कल्याणमधील एका अल्पवयीन मुलीवर त्याने अत्याचार केल्यानंतर त्याला अटक करण्यात आलेली होती. त्यानंतर त्याची रवानगी तळोजा कारागृहात झाली होती. त्याच ठिकाणी त्याने आज पहाटे गळफास लाऊन घेतला. गेल्या साडेतीन महिन्यांपासून विशाल गवळी हा तळोजा कारागृहात होता.
Published on: Apr 13, 2025 10:19 AM
Latest Videos
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी

