राज्यपाल भाजपची यादी लगेच मंजूर करतील- मिटकरी

राज्यपाल भाजपची यादी लगेच मंजूर करतील असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच पक्षादेशापुढे पदाला महत्व द्यायचं नाही, असं राज्यपालांनी ठरवलयं वाटतं असं म्हणत त्यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Aug 16, 2022 | 5:17 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरींनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारीं यांच्यावर परत एकदा निशाना साधला आहे. यावेळी मिटकरी यांनी राज्यपाल यांच्यावर निशाना 12 आमदारांच्या यादीवरून साधला आहे. तसेच त्यांनी राज्यपालांना टोला ही लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारने 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी पत्र देऊन ही त्या करण्यात आल्या नाहीत. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच गेलं. यानंतर आता शिंदे सरकारने 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्यपालांना पत्र देण्यार असल्याचे समोर आले आहे. त्यावर आपली प्रतिक्रीया देताना, राज्यपाल भाजपची यादी लगेच मंजूर करतील असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच पक्षादेशापुढे पदाला महत्व द्यायचं नाही, असं राज्यपालांनी ठरवलयं वाटतं असं म्हणत त्यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें