जयंत पाटील यांच्या त्या विधानावर शिवसेना नेत्याचा पलटवार, म्हणाला, “तुमचे किती जाणार?”
शिंदे गटातील खासदारांना भाजपाच्या तिकीटावर उभं राहायचं आहे,” असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. त्यावरून आता उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत. यावरून शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे.
औरंगाबाद : आगामी लोकसभा निवडणूक ही अवघ्या 1वर्षावर आली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. राज्यात 48 लोकसभेच्या जागा आहेत. त्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटाने कंबर कसली आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे गटाबाबत मोठं विधान केलं आहे. “शिंदे गटातील खासदारांना भाजपाच्या तिकीटावर उभं राहायचं आहे,” असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. त्यावरून आता उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत. यावरून शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे. तसेच त्यांनी यांनी ही माहिती मिळते कोठून असा सवाल केला आहे. तर जयंत पाटील यांनी आमचे आमदार कोणाकडून उभारणार? कोणाच्या तिकीटावर उभारणार याची काळजी करण्यापेक्षा तुमचे लोक जाणार नाहीत याची काळजी घ्या असा टोला लगावला आहे. तर आम्ही आमच्याच चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.
Published on: May 31, 2023 07:32 AM
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
