Navi Mumbai : मृतदेह चांगल्या कपड्यात गुंडाळण्यासाठी मागितली लाच… मनसे आक्रमक, बघा VIDEO
नवी मुंबईतील वाशी येथे एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. मृतदेह चांगल्या कपड्यात गुंडाळून द्या, असं सांगितल्यानंतर चक्क लाच मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे.
नवी मुंबईमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृतदेह चांगल्या कपड्यात गुंडाळण्यासाठी चक्क लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. नवी मुंबईतील महानगर पालिकेच्या वाशी रूग्णालयातील हा संतापजनक प्रकार आहे. दोन हजार रूपये लाच घेतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. तर लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्याला कामावरून बडतर्फ करत चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. या संतापजनक प्रकारानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. रूग्णालय अधीक्षकांचा राजीनामा मनसे कार्यकर्त्यांकडून मागण्यात आला आहे. इतकंच नाहीतर संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी नवी मुंबईतील महानगर पालिकेच्या वाशी रूग्णालयाच्या अधीक्षकांचा मांजरपाट कपड्याने सत्कार केल्याचेही पाहायला मिळाले.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

