Ghatkopar News : मुंबईत पुन्हा मराठी कुटुंबाचा अपमान; काय म्हणाले संदीप देशपांडे?
MNS Allegations About Marathi Family Insult : मुंबईच्या घटकोपरमध्ये मराठी - अमराठीचा वाद बघायला मिळाला आहे. गुजराती कुटुंबाने मराठी कुटुंबाला आमनस्पद वागणूक दिली असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
घाटकोपरमध्ये मराठी कुटुंबाला अपमानकारक वागणूक दिल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलेला आहे. मांसाहार करतात म्हणून अपमानकारक वागणूक दिली गेली असल्याचं मनसेने म्हंटलं आहे. गुजराती कुटुंबाने ही अपमानकारक वागणूक दिल्याचं मनसे पदाधिकाऱ्याच म्हणण आहे.
मुंबईत सातत्याने मराठी – अमराठीचा वाद पेटलेला बघायला मिळत आहे. अशातच पुन्हा एकदा घाटकोपरमध्ये मांसाहार करतात म्हणून मराठी कुटुंबाला सोसायटीमधील गुजराती कुटुंबाने अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना घडली असल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तर यावर मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हंटलं आहे की, माझ्याकडे या प्रकरणाचा व्हिडीओ आलेला आहे. मी संपूर्ण माहिती घेत आहे. मात्र जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल, ही राज ठाकरे यांनी सांगितलेली आमची भूमिका कायम असल्याचं देशपांडे यांनी म्हंटलं आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

