MNS : महिला आयोगाप्रमाणे राज्यात पुरूष आयोग स्थापन होणार? मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; पत्रात काय म्हटलंय?
देशभरात पुरुषांचा छळ आणि मानसिक अत्याचार याचे प्रमाण 51.5% असल्याचा उल्लेख करत मनसे नेत्यानं देवेंद्र फडणवीसांना एक मागणी करणारं पत्र लिहिलं आहे. ज्यात पुरूष आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे.
राज्य महिला आयोगाप्रमाणे महाराष्ट्रात आता पुरूष आयोग स्थापन करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे. मनसेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्य महिला आयोगाप्रमाणे राज्यात पुरुष आयोग स्थापन करा अशा मागणीचं पत्र पाठवण्यात आलं आहे. इतकंच नाहीतर या मागणीसाठी मनसेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पुढच्या चार ते पाच दिवसांत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाकडून ही मागणी करण्यात येणार आहे. राज्यात पुरुषांचा छळ, खोटे गुन्हे दाखल करणे यांसारखे प्रकार सर्रास सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुरुषांना दाद मागण्यासाठी राज्य पुरुष आयोगाची गरज असल्याचं मत मनसे नेते आशिष साबळे यांचं आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

