Brijbhushan Singh : बृजभूषण सिंहांविरोधात दादर पोलीस स्थानकात मनसेची तक्रार! वक्तव्य भोवणार?

भाजप खासदार बृजभूषण सिंग यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी दादर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी रितसर तक्रार दिली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

May 28, 2022 | 1:17 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि भाजप खासदार बृजभूषण सिंहांमध्ये (Brijbhushan Singh) मागच्या अनेक दिवसांपासून अयोध्या दौऱ्यावरुन वादंग सुरू आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याला खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला. यानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं. यानंतर राज ठाकरेंनी त्यांचा अयोध्या दौरा रद्द केला होता. मात्र, यादरम्यान बृजभूषण यांनी राज ठाकरेंसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तेच वक्तव्य त्यांना भोवलं आहे. या विरोधात दादर पोलीस (Dadar Police) स्थानकात मनसेनं (MNS) तक्रार दाखल केली आहे. दादरमधील मनसे पदाधिकारी आणि मनसे जनहीत कक्षाचे वकील दादर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. भाजप खासदार बृजभूषण सिंग यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी दादर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी रितसर तक्रार दिली आहे. मनसेचे उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी ही तक्रार दिली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें