Santosh Dhuri in BJP : कट्टर मनसैनिक अन् मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपात… BMC निवडणुकीपूर्वी मोठा राजकीय धक्का
मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी आज दुपारी एक वाजता भाजपात प्रवेश करणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, आपला राजकीय निर्णय दुपारनंतर जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे.
मनसेचे माजी नगरसेवक आणि कट्टर मनसैनिक संतोष धुरी आज दुपारी एक वाजता भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार आहेत. भाजप नेते अमित साटम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. धुरी यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना धुरी यांच्या भाजप प्रवेशामुळे मनसेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. संतोष धुरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ते आपला राजकीय निर्णय दुपारनंतर जाहीर करतील. आपण नाराज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, तिकिटाचा विषय नसल्याचेही त्यांनी नमूद केले. आमदार नितेश राणे यांनीही त्यांची भेट घेतल्याचे धुरी यांनी सांगितले. कोकणातील आणि जुने संपर्कात असलेले राणे स्वतः सिंधुदुर्गवरून भेटायला आल्याबद्दल धुरी यांनी आनंद व्यक्त केला.
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्..
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका

