AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील सर्व मशिदींमध्ये CCTV कॅमेरे लावा, बाळा नांदगावकर यांची सरकारकडे मागणी

राज्यातील सर्व मशिदींमध्ये CCTV कॅमेरे लावा, बाळा नांदगावकर यांची सरकारकडे मागणी

| Updated on: Apr 20, 2022 | 1:33 PM
Share

एकीकडे मनसेनं (Maharashtra Navnirman Sena) मशिदींच्या भोंग्यावरुन आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाच आता त्यात आणखी एका मुद्द्याची भर पडणार आहे.

एकीकडे मनसेनं (Maharashtra Navnirman Sena) मशिदींच्या भोंग्यावरुन आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाच आता त्यात आणखी एका मुद्द्याची भर पडणार आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर (MNS Leader Bala Nandgaonkar) यांनी याबाबत एक महत्त्वाचं ट्वीट केलं आहे. जवळपास सगळ्या मंदिरात CCTV लावले आहेत,परंतु मस्जिदीत CCTV आहेत का?, असा सवाल आता मनसे नेते बाळा नांदगावर यांनी उपस्थित केला आहे. सर्वधर्मीय” प्रार्थना स्थळात (Religious places) CCTV यंत्रणा का करू नये?, असंदेखील त्यांनी म्हटलंय. हे सर्व केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल.तसेच असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी, अस आवाहनही करण्यात आलं आहे.