AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray MNS Aurangabad : राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेला पाच पेक्षा जास्त संघटनांचा विरोध, पोलीसांसमोर पेच, तणावाची भीती?

राज ठाकरे यांच्या ठाण्यातील उत्तर सभेलाही पोलिसांनी परवानगी नाकारली होती. औरंगाबादमध्येही अनेक राजकीय संघटनांनी राज ठाकरेंच्या सभेला विरोध केला आहे. त्यामुळे औरंगाबाद पोलीसदेखील तशीच भूमिका घेतील, अशी शक्यता आहे.

Raj Thackeray MNS Aurangabad : राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेला पाच पेक्षा जास्त संघटनांचा विरोध, पोलीसांसमोर पेच, तणावाची भीती?
मनसे अध्यक्ष राज ठाकरेImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 20, 2022 | 1:25 PM
Share

औरंगाबादः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या 01 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा घेण्याची घोषणा केली आहे. यासाठी औरंगाबाद मनसेचे पदाधिकारी उत्साहाने कामालाही लागले आहेत. शहरातील खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी मनसेने पोलीस आयुक्तांची (Aurangabad police commissioner) भेट घेऊन सभेकरिता परवानगी मागणारे निवेदनही सादर केले आहे. मात्र राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या या सभेला अनेक राजकीय संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. पोलिसांनी अद्याप या सभेला परवानगी दिलेली नाही. परवानगीपत्र, शहरातील विविध संघटनांचा विरोध आणि कायदा याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मंगळवारी दिवसभर बैठक सत्र सुरु होते. आजदेखील या विषय़ावरून अधिकाऱ्यांच्या बैठका होण्याची शक्यता आहे.

कोणत्या संघटनांचा विरोध?

राज ठाकरे यांच्या सभेला विरोध करत मुस्लिम नुमाइंदा कौंसिल, वंचित बहुजन आघाडी, मौलाना आझाद विचार मंच, ऑल इंडिया पँथर सेना, प्रहार जनशक्ती पक्ष, गब्बर अॅक्शन संघटना आदींनी पोलीस आयुक्तांना यासाठीचे निवेदन दिले आहे. राज ठाकरे यांच्या या सभेमुळे शहरातील धार्मिक सलोखा बिघडू शकतो, त्यामुळे त्यांच्या या सभेला परवानदी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मनसेचे पोलिसांना काय निवेदन?

दरम्यान, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची काल भेट घेतली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर या सभेसाठी जवळपास 01 लाख लोक येतील असा अंदाज मनसेने व्यक्त केला आहे. त्यामुळे दुपारी 4.30 ते रात्री 9.45 वाजेपर्यंत ही परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आय़ुक्तांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेत, त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्टेज, अग्निशमन, वीजपुरवठा आदींची परवानगी घ्या, आम्ही निरीक्षण करू, असे आश्वासन दिले. या वेळी जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, दिलीप बनकर, सतनामसिंग गुलाटी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

परवानगी मिळाली नाही तर?

राज ठाकरे यांच्या ठाण्यातील उत्तर सभेलाही पोलिसांनी परवानगी नाकारली होती. औरंगाबादमध्येही अनेक राजकीय संघटनांनी राज ठाकरेंच्या सभेला विरोध केला आहे. त्यामुळे औरंगाबाद पोलीसदेखील तशीच भूमिका घेतील, अशी शक्यता आहे. त्यात येत्या 03 मे पर्यंत सर्व मशिदींवरील भोंगे हटवले पाहिजेत, असा इशारादेखील राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे संवेदनशील परिस्थिती पाहता, पोलीस या सभेला परवानगी नाकारू शकतात. दरम्यान, पोलिसांनी परवानगी दिली नाही तरीही राज ठाकरे यांची सभा 01 मे रोजीच होणार, असे मनसेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

इतर बातम्या-

Aurangabad PHOTO | जगप्रसिद्ध कैलास लेणीचं मनोहारी रूप, जागतिक वारसा दिनी 300 प्रकाशझोतांनी उजळली, औरंगाबादकरांना अनोखी भेट

Aurangabad : औरंगाबादचे कवी संदीप जगदाळे यांना पहिला केदारनाथ सिंह स्मृती सन्मान; वाराणसीत झाला गौरव

ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....