Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'संजय राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', शिंदेंच्या शिवसेनेवरील 'त्या' टीकेवरून मनसे नेत्याचा खोचक टोला

‘संजय राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान…’, शिंदेंच्या शिवसेनेवरील ‘त्या’ टीकेवरून मनसे नेत्याचा खोचक टोला

| Updated on: Feb 18, 2025 | 5:32 PM

‘कुंभमेळ्यातही शिंदेंच्या शिवसेनेच्या त्या ४० आमदारांचं पाप धुतलं जाणार नाही’, असं म्हणत शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांच्या कुंभमेळा दौऱ्यावर संजय राऊत यांनी खोचक टीका केली. इतकंच नाहीतर कुंभमेळ्याला जाण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना एक पवित्र साबण द्यावा, असेही त्यांनी म्हटलं होतं.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आगामी प्रयागराज कुंभमेळा दौऱ्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार असल्याची माहिती काल सूत्रांकडून समोर आली होती. यावरून बोलताना संजय राऊत यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. कुंभमेळ्याला जाण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना एक पवित्र साबण द्यावा, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी शिवसेनेवर केली होती. तर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरून मनसे नेते प्रकाश महाजन यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. ‘संजय राऊत यांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान उघडावं’, असा खोचक टोला प्रकाश महाजन यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. ‘कुंभमेळ्यात जागोजागी संजय राऊत नावाचा साबण ठेवायला हरकत नाही. संजय राऊत यांना आणखी दोन जन्म घयावी लागतील एवढी त्यांनी पापं केली आहेत जी कुंभमेळ्यात जाऊन देखील धुतली जाणार नाही’, असंही प्रकाश महाजन म्हणाले.

Published on: Feb 18, 2025 05:32 PM