Raj Thackeray Video : ‘छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण…’, औरंगजेबच्या कबरीवरून राज ठाकरेंचा भाजपला टोला
राज ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीसाठी मनसेचे नेते, सरचिटणीस, मुंबईतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरही बैठक होती. 30 मार्च रोजी मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क मैदान येथे पार पडणार आहे.
राज्यभरातून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत आंदोलनं होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच काल याच मुद्यावरून नागपुरात हिंसाचार उफाळून आला तर काही भागात पोलिसांकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशातच राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबत काही जणांना आज जाग आली असं वक्तव्य केलंय. राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची मुंबईतील दादर येथील सावरकर सभागृहात बैठक बोलावली होती. या बैठकीत राज ठाकरेंनी भाजपला टोला लगावला आहे. दरम्यान, गंगा स्नानाबद्दल बोलताना राज ठाकरे बैठकीत म्हणाले की, मी ओघात बोललो असलो तरी विचाराने बोललो. तर छावा कादंबरीचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले की, छावा कादंबरी शिवाजी सावंत यांनी ६० वर्षापूर्वी लिहिली पण औरंगजेबच्या कबरीबाबत काहींना आता जाग आली. असा खोचक टोला लगावत ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात या मुद्यावर अधिक बोलणार असल्याचे स्पष्ट केलं.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..

