MNS : चमचेगिरी अन् चमकोगिरी म्हणत मनसेचा निशाणा, ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं बाहेर येऊन घास…
ठाकरे युतीसाठी सकारात्मक असले तरी जुना इतिहास मनसेच्या नेत्यांच्या मनातून जाताना दिसत नाही तर 19 वर्षापासून मनसेबद्दल उत्साह का नव्हता? अचानक उद्धव ठाकरे, राज ठाकरेंचे बॅनर कसे लागतायत? बाळासाहेबांचा फोटो लावण्यास मनाई करणारे कसे बदलले? असे सवाल मनसेने ठाकरेंना केलेत.
ठाकरे बंधुच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना स्वतः ठाकरेंची शिवसेना आणि त्यांचे नेते सकारात्मक असल्याचे पाहायला मिळाले. मात्र राज ठाकरे यांचा मनसे पक्ष अद्याप युतीसाठी साशंक असल्याचे दिसतंय. यावरूनच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक पोस्ट करत ठाकरेंच्या नेत्यांवर निशाणा साधलाय. ट्रम्पपासून गल्लीतल्या नगरसेवकाला प्रश्न विचारणारे आम्हाला सल्ले देतात की प्रश्न विचारू नका. मग आमचाही सल्ला आहे, ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये, असं म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांवर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. ते पुढे असेही म्हणाले की, जे बोलायचं आहे ते तुमचे आणि आमचे पक्ष प्रमुख बोलतील तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा, असा सल्लाच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांना दिल्याचे पाहायला मिळाले.
ट्रम्प पासून गल्लीतल्या नगरसेवकाला प्रश्न विचारणाते आम्हाला सल्ले देतात की प्रश्न विचारू नका .मग आमचाही सल्ला आहे ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये .जे बोलायचं आहे ते तुमचे आणि आमचे पक्ष प्रमुख बोलतील तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 22, 2025

युनेस्कोत शिवरायांचा गौरव; शिवराज्याभिषेक अन् राजमुद्रेचंही कौतुक

उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; 'या' सेवांवर होणार परिणाम

अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?

मध्यरात्र ते दुपारी 4 पर्यंत मीरारोडच्या मनसेच्या मोर्चात बघा काय घडल?
