राज ठाकरेंना एकत्र यायचंय की नाही? ठाकरेंची शिवसेना पॉझिटिव्ह पण मनसेला कसली शंका?
संजय राऊतांकडून एकत्र येण्यावरून सकारात्मकतेची भाषा सुरू आहे. पण मनसेकडून शंका उपस्थित केली जाते. ठाकरेंची शिवसेना आत्ताच कशी सकारात्मक म्हणत संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंच्या एका जुन्या भाषणाची क्लिप ही ट्विट केली.
मराठी माणसाची एकजूट राहावी एकत्रित पुढचं राजकारण करावं. हीच उद्धव ठाकरेंची भूमिका असल्याचं संजय राऊत सांगतायत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेच सध्या समविचारी नेते असल्याचं सांगून राऊतांनी आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात आहे तेच करणार असं सांगून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे सोबत सकारात्मकता दाखवलेली आहेच पण दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये किंवा दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये युतीची चर्चा सार्वजनिक मंचावरच आहे. स्वतः ठाकरेंची शिवसेना आणि त्यांचे नेते सकारात्मक असले तरी जुना इतिहास आणि घडलेल्या राजकीय घडामोडी मनसेच्या नेत्यांच्या मनातून जाताना दिसत नाही. त्यामुळे मनसेचे काही सवाल आहेत. 19 वर्षापासून मनसेबद्दल उत्साह का नव्हता? अचानक उद्धव ठाकरे, राज ठाकरेंचे बॅनर कसे लागतायत? बाळासाहेबांचा फोटो लावण्यास मनाई करणारे कसे बदलले? काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाताना नेत्यांच्या कधी बैठका घेतल्या का? तर भूतकाळात जाऊ नका असा सल्ला राऊत देत आहे.