मनसे नेते संदीप देशपांडे मुंबई पालिका आयुक्तांची भेट घेणार, काय आहे कारण?
VIDEO | मनसे नेते संदीप देशपांडे मुंबई पालिका आयुक्तांची दुपारी ३ वाजता भेट घेणार, ट्वीट करून कोणती दिली माहिती?
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रूग्णालयात गेल्या काही दिवसांपूर्वी गरीब रूग्ण सहाय्यता निधीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. यापार्श्वभूमीवर माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आयुक्त इकबाल सिंग चहल यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आज मनसे नेते संदीप देशपांडे मुंबई पालिका आयुक्तांची भेट घेणार आहे. मनसे नेते संदीप देशपांडे मुंबई महापालिकेतील आयुक्तांची आज दुपारी तीन वाजता कोरोनामहामारीच्या काळात मुंबईतील केईएम रूग्णालयामधील झालेल्या भ्रष्टाचाराबाबत ही भेट घेणार आहेत. ट्वीट करून संदीप देशपांडे यांनी ही स्वतः माहिती दिली आहे. ‘आज दुपारी तीन वाजता करोना काळात झालेला भ्रष्टाचार तसेच KEM रुग्णालयात झालेल्या गरीब निधी योजनेतील भ्रष्टाचार या संदर्भात मा. महापालिका आयुक्त यांची भेट घेणार’, असे संदीप देशपांडे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

