Yashwant Killedar : तुमच्या बोलघेवड्या पुत्राला..; यशवंत किल्लेदार राणेंवर भडकले
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेची खिल्ली उडवल्या नंतर मनसे नेते राणे पिता पुत्रांवर चांगलेच संतापलेले आहेत. त्यामुळे राणेंवर जोरदार टीका केली जात आहे.
मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी नारायण राणे यांच्या विरोधात ट्विट केलं आहे. महाराष्ट्र सैनिकांना धमक्या देण्याची हिम्मत करू नका, असं किल्लेदार यांनी म्हंटलं आहे. काडी करणाऱ्याला आम्ही सोडत नाही, असा इशाराच किल्लेदार यांनी या ट्विटमधून राणेंना दिला आहे.
ट्विट मध्ये किल्लेदार यांनी लिहिलं आहे की, नारायण राणे जर आदरणीय राज ठाकरे आणि तुमचे संबंध सांगण्यापलीकडे असतील तर तुम्ही तुमच्या बोलघेवड्या पुत्राला यावर घालणं अपेक्षित आहे. आणि महाराष्ट्र सैनिकांना धमक्या देण्याची हिम्मत करू नका. आम्ही उगाच कोणाच्या काड्या करत नाही आणि काड्या करणाऱ्याला सोडत नाही, असा थेट इशाराच राणे यांना किल्लेदारांनी दिला आहे.
Published on: Jun 10, 2025 09:12 AM
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

