Raju Patil : मराठा समाजातील तरूणांना राजू पाटील यांचं आवाहन; म्हणाले, सरकारला काही पर्वा नाही…
VIDEO | मराठा आरक्षण आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात काही तरुणांनी आत्महत्या केली, यावर मनसे आमदार राजू पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'आत्महत्येसारखा असा अगदी टोकाचा निर्णय घेऊ नका. तुमच्या जीवाची या सरकारला काही पर्वा नाही.'
ठाणे, २३ ऑक्टोबर २०२३ | मनसे आमदार राजू पाटील यांनी मराठा समाजातील तरूणांना विनंती करत तरुणांनो टोकाचे पाऊल उचलू नका असे आवाहन केले आहे. कायदेशीर असणारं आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय. त्यांच्यावर विश्वास ठेवा. सरकार हे आपापसात लढून निवडणुका कशातरी काढण्याच्या भानगडीत असते, तर त्यांच्यावरही लक्ष ठेवा. पण आत्महत्येसारखा असा अगदी टोकाचा निर्णय घेऊ नका. तुमच्या जीवाची या सरकारला काही पर्वा नाही. तुमचे नेते जरांगे पाटील आज जे काही आंदोलन करत आहेत. जागोजागी हात जोडून सांगत आहेत आत्महत्या करू नका. कुठेतरी अशा लोकांचा मान राखा, त्यांच्यावर विश्वास ठेवा. नाही झालं तर तुमच्याकडे पर्याय आहे, असे राजू पाटील म्हणाले. तर जरांगे पाटील सांगताय 25 तारखेपर्यंत वाट बघू घोड मैदान जवळ आहे. परंतु या गोष्टीवर राज ठाकरे नेहमी सांगताय की निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाच्या नावावर, जाती पातीवर भांडत ठेवतील आणि निवडणुका पार पाडून घेतील, त्यामुळे गाफिल राहू नका असे आवाहनही राजू पाटील यांनी केले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

