राज ठाकरे यांची जाहीर सभा, रत्नागिरीत बघा कसंय वातावरण?
VIDEO | रत्नागिरीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा, नियोजन अंतिम टप्प्यात, बघा कशी सुरूये तयारी?
रत्नागिरी : बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी उध्दव ठाकरे बारसू दौऱ्यावर आहेत तर उद्धव ठाकरे यांनी कोकणात येऊन दाखवावं असं आव्हान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील 6 मे रोजी कोकण दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे एकाच वेळी कोकणात दोन ठाकरी तोफा धडाडतांना दिसणार आहे. रत्नागिरीमध्ये या सभेच्या पूर्वीची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांची जाहीर सभा ही रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे होणार आहे. कालच राज ठाकरे हे रत्नागिरीमध्ये दाखल झाले आहेत. राज ठाकरे सध्या रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात थाबंले आहे. या सभेची वातावरण निर्मिती मनसेकडून जोरदार करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांच्या सभास्थळावरून थेट बघा तयारीचा आढावा…
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य
तू अजून जिवंत? BJP नेत्याला तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यावरून पुन्हा धमकी

