‘शिवतीर्थ’वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी
आज धूळवडनिमित्त सगळीकडे रंगांची उधळण होत असतानाच राजकीय नेत्यानी देखील आपल्या कुटुंबासोबत आणि कार्यकर्त्यांसोबत रंग खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी राज ठाकरे देखील आपल्या कुटुंबासोबत रंग खेळताना बघायला मिळाले.
मुंबईसह राज्यात आज धूळवडचा उत्साह बघायला मिळाला. रंगांची उधळण करत प्रत्येकजण रंगात न्हाऊन निघल्याचं बघायला मिळालं. होळी आणि धूळवडनिमित्त आज सगळीकडे रंगांची उधळण केली जात आहे. राजकीय नेत्यांनी देखील आज रंग खेळण्याचा मनमुराद आनंद लुटलेला बघायला मिळाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील शिवतीर्थावर कुटुंबासोबत धूळवड खेळल्याचं बघायला मिळालं. यावेळी अमित ठाकरे यांनी देखील कार्यकर्त्यांसोबत रंग खेळत होळीच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण ठाकरे कुटुंब आणि मनसे कार्यकर्ते यावेळी रंगलेले बघायला मिळाले.
Published on: Mar 14, 2025 03:26 PM
Latest Videos

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
