Thackeray Brothers : हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू आक्रमक, उतरले मैदानात अन् केली मोठी घोषणा
येत्या ६ जुलै रोजी रविवारी मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसेकडून महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले आहेत. तर दुसरीकडे सात जुलैला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीचं आंदोलन होणार आहे.
महाराष्ट्रातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी भाषा विषय लागू करण्याच्या निर्णयाला राजकीय वर्तुळातून विरोध केला जातोय. राज्यात पहिलीच्या वर्गापासून तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याच्या सक्तीविरोधात आता ठाकरे बंधू चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून दोन वेगवेगळ्या मोर्चांची घोषणा करण्यात आली आहे.
‘कारण नसताना हिंदीची सक्ती हा विषय जो काही महाराष्ट्रद्रोही सरकारकडून लादला जात आहे. त्याला विरोधी करण्यासाठी सर्व मराठी माणसं पक्षीय भेदाभेद विसरून एकत्र आली पाहिजे. शिवसेनेचा जन्मच मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी झाला आहे. आता समजलं असेल यांना शिवसेना का संपवायची आहे. कारण यांना महाराष्ट्रावर हुकूमशाही लादायची आहे. कारण तसं पाहिलं तर आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही, कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही. पण याचा अर्थ कोणतीही भाषा आमच्यावर सक्तीने लादून घेणार नाही’, असं उद्धव ठाकरे म्हणाले तर कोणताही झेंडा नसेल मराठी हा अजेंडा असेल. या अजेंड्यासाठी मराठी माणसांनी सहभागी व्हावं. सरकारला दाखवावं. साहित्यिक एलकुंचवार यांनीही विरोध केला आहे. राजकीय पक्षांव्यतिरिक्त कोण कोण सामील होतात हे पाहायचं आहे. कोण येणार नाही हेही मला पाहायचं आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

