Raj Thackeray : हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरेंची गर्जना… मुंबईत 6 जुलैला महामोर्चा, कसा असणार मार्ग? बघा काय म्हणाले?
'येत्या ६ जुलै रोजी गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाचा कोणताही झेंडा नसेल, तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल. साहित्यिक, शिक्षण तज्ज्ञ आणि इतरांशी बोलणार आहोत. आम्ही त्यांना आमंत्रण देणार आहोत.', असं राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून ते पाचवीपर्यंत तिसरी भाषा ही हिंदी भाषा अनिवार्य असेल, असं शुद्धिपत्रक राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने जारी करण्यात आलं. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केला. हिंदी भाषा सक्तीविरोधात राज ठाकरेंनी यापूर्वी देखील आपली भूमिका मांडली तर काही ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच आज राज ठकारे यांनी पत्रकार परिषद घेऊन एक माय मराठीसाठी एक मोठी घोषणा केली. येत्या 6 जुलै रोजी मुंबईत मराठी भाषेसाठी आणि हिंदी भाषा सक्ती विरोधात त्यांनी महामोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. हा मोर्चा 6 जुलै रोजी गिरगाव चौपाटीवरून काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदीची सक्ती होऊ देणार नाही असे म्हणत असताना राज ठाकरे म्हणाले, शिक्षण मंत्री दादा भुसे येऊन गेले. त्यांची भूमिका सांगण्याचा प्रयत्न केला. जी संपूर्ण भूमिका मी फेटाळून लावली. ते जे दाखले देत होते. पाचवीपासून नंतरच तिसऱ्या भाषेचा विषय येतो. त्यांनी हे मान्य केलं की, राष्ट्रीय शिक्षण धोरणात कोणत्याही गोष्टीचा समावेश नाही. सीबीएससी शाळा या नव्याने आल्या. त्या आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी काढलेल्या शाळा होत्या. त्या शाळांचा वर्चस्व राज्यातील शाळांवर करण्याचा प्रयत्न आहे. तोच केंद्र आणि आयएएस अधिकाऱ्याांचा अजेंडा आहे. महाराष्ट्र हे का करतोय? त्यांच्याकडे काही गोष्टींचे उत्तर नव्हतं. आमचा या सर्व गोष्टीला विरोध होता असेल आणि राहणार, हे राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

