भारतीय घटना तयार करण्यास किती वेळ आणि पैसा लागला?, कसे तयार झाले जगातले सर्वात मोठे संविधान ?
भारताचे संविधान निर्माण करण्यासाठी १९४६ मध्ये भारताची संविधान सभा स्थापन करण्यात आली होती. इ.स.१९४७ मध्ये भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य दिल्यानंतर, संविधान सभेने भारताची पहिली संसद म्हणूनही काम केले होते.

Republic Day Special: जगातले सर्वात मोठे लिखित संविधान असलेल्या भारतीय घटनेला तयार करण्यात किती खर्च आला होता. आणि यास किती लोकांनी तयार केले. याची उत्सुकता तुम्हाला असेल तर याबाबत प्रजासत्ताक दिना निमित्त आपण माहिती घेऊयात. आज देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे.या मुहूर्तावर भारतीय संविधानाची इत्यंभुत माहिती आपण या लेखात घेऊयात… भारतीय संविधान निर्मितीसाठी किती खर्च आला होता. आणि किती लोकांनी या घटनेच्या निर्मितीत काम केले होते याची माहिती आपण घेऊयात.संविधान सभेला भारतीय घटनेची निर्मितीसाठी ३ वर्षांचा काळ लागला होता. या कामात ३०० हून जास्त सदस्य सामील होते. हजारो तासांच्या...
