Raj Thackeray : कोण तो रसमलाई…मुंबईवर बोलतो, भXXXव्या तुझा काय…. राज ठाकरेंकडून अण्णामलाईंच्या वक्तव्याचा समाचार
भाजप नेते के. अण्णामलाई यांच्या मुंबईविषयीच्या वक्तव्यावरून ठाकरे बंधूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज ठाकरे यांनी अण्णामलाईंना रसमलाई संबोधत प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर उद्धव ठाकरे यांनी हे भाजपच्या मनातले विचार असल्याचे म्हटले. दोन्ही नेत्यांनी मुंबई महाराष्ट्राची असल्याचा पुनरुच्चार केला.
भाजप नेते के. अण्णामलाई यांच्या मुंबईवरील वक्तव्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. तामिळनाडूचे भाजप नेते के. अण्णामलाई यांनी मुंबई ही महाराष्ट्राची नव्हे तर एक आंतरराष्ट्रीय शहर असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्रात राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अण्णामलाई यांना रसमलाई संबोधत, “कोण तो रसमलाई? मुंबई महाराष्ट्राची नाही असं बोलतो,” अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली.
ठाकरेंनी अण्णामलाई यांना मुंबई आणि महाराष्ट्राच्या संबंधावर बोलण्याचा अधिकार काय, असा सवाल केला. त्याचबरोबर, राज ठाकरे यांनी भाजप नेते कृपाशंकर सिंग यांच्या उत्तर भारतीय महापौर करण्याच्या वक्तव्याचाही उल्लेख करत अशा प्रवृत्तींवर टीका केली. तर, उद्धव ठाकरे यांनी अण्णामलाई यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “अण्णामलाई नकळतपणे भाजपच्या मनातले काळं बोलून गेले आहेत.” दोन्ही ठाकरे बंधूंनी मुंबईच्या अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत भाजपच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे.
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ
कोण तो रसमलाई...भXXXव्या तुझा काय...राज ठाकरेंकडून अण्णामलाईंवर निशाणा
'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत राज ठाकरेंकडून थेट मुंबईकरांना इशारा
....तरच नवऱ्याला जेवण द्या, पंकजा मुंडे यांचे मतदारांना अनोखे आवाहन

