Raj Thackeray Meet Sanjay Raut : ज्या प्रकारे तुझा आजार… राज अन् राऊतांमध्ये अर्धा-पाऊण तास चर्चा, काय दिला सल्ला?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या भांडुपमधील निवासस्थानी भेट घेतली. राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करत राज ठाकरे यांनी त्यांना गंभीर आजारातून बरे होण्यासाठी दीड महिना सार्वजनिक जीवनापासून दूर राहून आराम करण्याचा सल्ला दिला. राज ठाकरे गेली काही काळ फोनवरून राऊतांच्या तब्येतीबद्दल चौकशी करत होते.
राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. संजय राऊत गेल्या सुमारे महिनाभरापासून आजारी आहेत आणि त्यांना गंभीर आजाराचे निदान झाल्याचे त्यांनी स्वतः माध्यमांना कळवले होते. या आजारामुळे त्यांनी काही काळ माध्यमांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. राज ठाकरे हे गेल्या काही काळापासून संजय राऊत यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त करत होते आणि त्यांच्या तब्येतीची माहिती घेण्यासाठी त्यांचे बंधू सुनील राऊत यांच्याशी फोनवरून सतत संपर्कात होते.
सुनील राऊत यांनी सांगितले की, राज ठाकरे राऊतांना अमेरिकेला उपचारांसाठी न्यावे की अन्य काय करावे याबद्दलही चौकशी करत होते. आज राज ठाकरे यांनी थेट राऊतांच्या निवासस्थानी भेट देत त्यांची विचारपूस केली. राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये सुमारे अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली. या भेटीदरम्यान, राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना त्यांच्या आजाराच्या गांभीर्याकडे लक्ष देऊन दीड महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहून पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला. लोकांमध्ये न मिसळता विश्रांती घेतल्यास लवकर बरे होण्यास मदत होईल, असे राज ठाकरे यांनी सुचवले.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?

