महायुतीला ‘मनसे’ पाठिंबा की फक्त ‘राज’कीय? मनसेवर टीका तीच मात्र टिकाकार बदलले
राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्या मेळाव्यातील भाषणातील मुद्दे त्यांच्याच भूमिकेच्या चक्रव्युहात अडकलेत. काही मनसैनिकांनी आपले राजीनामे दिलेत तर काही मनसैनिकांनी राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचं कौतुक केलंय. महायुतीला पाठिंबा दिल्याने विरोधक प्रश्न करताय.. बघा स्पेशल रिपोर्ट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण आणि यादरम्यान त्यांनी घेतलेली भूमिका सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरतोय. सोशल मिडियात यावरूनच दोन्ही बाजूने घमासान रंगलंय. महायुतीच्या नेत्यांकडून राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत होतंय तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका होतेय. २०१९ ला जे महायुतीचे नेते बोलत होते. ते आता मविआचे नेते बोलताय. मनसेचे टीकाकार बदलले मात्र टीका कायम आहे. राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्या मेळाव्यातील भाषणातील मुद्दे त्यांच्याच भूमिकेच्या चक्रव्युहात अडकलेत. काही मनसैनिकांनी आपले राजीनामे दिलेत तर काही मनसैनिकांनी राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचं कौतुक केलंय. राज ठाकरे म्हणाले राजकीय व्यभिचार करणाऱ्यांना जनतेनं मान्यता देवू नये. त्याच भाषणात त्यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याने विरोधक प्रश्न करताय.. बघा स्पेशल रिपोर्ट

