Thackeray Brothers : हिंदी GR रद्द झाल्यानंतर ठाकरे बंधूंचं मराठी जनतेला एकत्रित पत्र, आम्ही वाट बघतोय…
हिंदी भाषा सक्तीचा शासन निर्णय रद्द झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्रित एक पत्र व्हायरल होत आहे. तर मराठी जनांनी सरकारला नमवलं असा उल्लेखही या पत्रात करण्यात आलाय.
येत्या ५ जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याची अधिकृत निमंत्रणाचं एक पत्र व्हायरल होत आहे. मुंबईतील वरळी डोम सभागृहात ठाकरे बंधूंचा हा हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात ऐतिहासिक विजयी मेळावा पार पडणार आहे. व्हायरल होणाऱ्या पत्रात हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात मराठी माणसाच्या एकजुटीने मिळवलेल्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी थेट मराठी जनतेला उद्देशून भावनिक आवाहन करण्यात आलंय.
या पत्राचं शीर्षक आवाज मराठीचा असं असून यामध्ये असं म्हटलंय की, मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का ? तर हो नमवलं…! कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं ! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या !! आम्ही वाट बघतोय…!, असं आवाहन ठाकरे बंधूंकडून करण्यात आलंय. तर ५ जुलै रोजी होणाऱ्या विजयी मेळाव्यासाठी राज ठाकरे – उद्धव ठाकरे यांच्याकडून मराठी जनतेला निमंत्रण देण्यात आलंय.

पोलीसच त्याला तंबाखू मळून देत होते, आव्हाड आक्रमक; रात्री घडलं काय?

विधानभवनात मारहाण करणारा पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले नेमका कोण?

नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांसमोर आव्हाडांचा ठिय्या

ठाकरे शिंदे भांडतायत... इकडे ठाकरे फडणवीस भेटतायत, 30 मिनिटं खलबतं
