Ayodhya Poul : अनैतिक संबंध ठेवणारा संजय राठोड… त्याला भरचौकात… ठाकरे गटाच्या महिला नेत्यानं काढली अक्कल, Audio व्हायरल
अयोध्या पौळ यांनी रविवारी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी संजय राठोड यांचा वारकरी वेशभूषेतील एक फोटो पोस्ट केला आहे. यावरूनच संजय राठोड यांच्या कार्यकर्त्याने फोन केला असल्याची माहिती मिळतेय.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या अयोध्या पौळ यांची एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये अयोध्या पौळ यांनी मंत्री संजय राठोड यांना चपलेने मारण्याची भाषा केल्याचे ऐकायला मिळत आहे. मंत्री संजय राठोड यांच्या कार्यकर्त्याला बोलताना अयोध्या पौळ यांनी संजय राठोड यांना चपलेने मारण्याचा उल्लेख केला आहे. ही ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होत असून टीव्ही ९ मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही
या ऑडिओ क्लिपनुसार, संजय राठोड यांच्या कार्यकर्त्याने अयोध्या पौळ यांना कॉल केला. त्यावर अयोध्या म्हणाल्या कोण बोलत आहे जरा लवकर बोला. त्यावर संजय राठोड यांच्या कार्यकर्त्यानं एका पोस्टबद्दल विचारणा केली. त्यावर बोलताना अयोध्या पौळ चांगल्याच भडकल्या. ‘तुम्ही ज्यांचे नाव घेतले ते नाव माझ्या पोस्टमध्ये आहे का? पोस्टमध्ये काय लिहिले आहे ते वाचायची अक्कल नाही का? अनैतिक संबंध लोकांकडे ठेवणारा, अहो, ते सगळे चित्रा वाघ यांनी काढले न. असल्या माणसाला चपलेने बडवले पाहिजे. संजय राठोड सारख्याला भरचौकात चपलेने मारले पाहिजे. मी पुन्हा तिसऱ्यांदा म्हणते संजय राठोड सारख्या माणसाला ज्यांच्यावर चित्रा वाघ यांनी आरोप केले आहेत, त्यांच्या आरोपानुसार संजय राठोड सारख्या माणसाला भरचौकात चपलेने बडवले पाहिजे, असे अयोध्या पौळ यांनी म्हटले आहे