Railway Ticket Fare: ट्रेनचा प्रवास महागला, कोण-कोणत्या गाड्यांचे तिकीट वाढलं? किती होणार भाडेवाढ?
तुम्ही रेल्वे, मेल आणि एक्स्प्रेस ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे कारण मेल आणि एक्स्प्रेसच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. कशी असणार वाढ? बघा व्हिडीओ
आजपासून अर्थात १ जुलैपासून रेल्वेच्या तिकिटांमध्ये दरवाढ लागू होणार आहे. ही दरवाढ मेल आणि एक्स्प्रेसच्या तिकिटांसाठी असणार आहे. साधारण नॉन एसी श्रेणीतील रेल्वे गाड्यांसाठी ही दरवाढ लागू असणार आहे. तर सेकंड क्लासने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मात्र दिलासा मिळाला आहे कारण या भाडेवाढमधून सेकंट क्लासच्या ५०० किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी भाडेवाढ नसणार आहे.
अशी होणार भाडेवाढ
सेकंड क्लासच्या ५०० ते १५०० किमीच्या प्रवासात पाच रूपयांची दरवाढ होणार आहे. १५०१ ते २५०० किमीसाठी १० रूपये तर २५०१ ते ३००० किमीसाठी १५ रूपये तिकिटाचे दर वाढवले जाणार आहेत.
स्लीपर क्लास सर्वसाधारण आणि प्रथम श्रेणी साधारण तिकिटाच्या दरात प्रतिकिमी ०.५० पैशांची वाढ करण्यात आली आहे.
नॉन एसी द्वितीय श्रेणी, स्लिपर क्लास आणि प्रथम श्रेणीचा तिकीट दर १ पैसा प्रती किमीसाठी वाढवण्यात येणार आहे. यासह सर्व प्रकारच्या एसी रेल्वेच्या तिकीट दरात २ पैसा प्रती किमी वाढ होणार आहे.

त्यापेक्षा माझा पोलिसांनी एन्काऊंटर करावा, ज्ञानेश्वरी मुंडे संतापल्या

मनसेवर तुटून पडणारे आता कुठे लपलेत? राज ठाकरेंचा आक्रमक सवाल

...तर BJP 150 जागाही जिंकणार नाही, मोदींचं नाव घेत दुबेंचा मोठा दावा

विधीमंडळातील राड्यानंतर कठोर नियम, या व्यक्तींना विधानभवनात नो एन्ट्री
