Mira Bhayandar : मारहाणीपूर्वी नेमकं काय घडलं? मारहाण झालेले व्यापारी ‘tv9 मराठी’वर
MNS Protest Viral Video : मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेल्या व्यापाऱ्याने आज टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीशी संवाद साधत घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे.
मनसे कार्यकर्त्यांनी येऊन मराठी बोलली पाहिजे असे सांगत मला मारहाण केली तसेच शिवीगाळ केली, असा आरोप मीरा भाईंदर येथे मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेल्या व्यापाऱ्याने केला आहे. मीरा भाईंदरमध्ये काही दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याला मराठीच्या मुद्द्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या घटनेत मारहाण झालेल्या व्यापाऱ्याने आज टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना हा आरोप केला आहे.
यावेळी बोलताना या व्यापाऱ्याने सांगितलं की, हिंदी भाषेचा जीआर रद्द झाला त्या रात्री साधारण साडे दहा वाजता मनसे पक्षाचे सहा ते सात जण दुकानात आले. कॅश काऊंटरजवळ येऊन त्यांनी पाण्याची बॉटल मागितली. पाण्याची बॉटल दहा रुपयांची हवी आहे की 20 रुपयांची हवी आहे, असं कॅश काऊंटरजवळच्या कर्मचाऱ्याने विचारलं. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते म्हणाले की हिंदी नव्हे तर मराठीत बोल. महाराष्ट्रात व्यवसाय करायाचा असेल तर मराठी बोलावं लागेल,असं हे कार्यकर्ते म्हणाले. तसेच त्यांनी दुकानातील कर्मचाऱ्यांना शिव्या दिल्या. दुकान फोडून टाकण्याचीही त्यांनी धमकी दिली, अशी माहिती व्यापार्याने दिली आहे.

Padalkar : तुम्हाला जमत नसेल तर मी बोलत नाही, पडळकर भरसभागृहात भडकले

एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, 'विधान भवनाचं पावित्र्य ...'

भास्कर जाधवांवर का आली सभागृहात वारंवार माफी मागण्याची वेळ?

आव्हाडांच्या मुलीला पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून गलिच्छ शिव्या अन्..
