AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Eknath Shinde यांच्या निवासस्थानी मनसे कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

| Updated on: Aug 02, 2022 | 9:22 PM
Share

मनसेचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, माजी खारघर शहर प्रमुख प्रसाद परब एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेत. उरण आणि पनवेलमधील मनसे, खारघरची पूर्ण टीम शिंदे गटात सामील झाली.

पनवेल : पनवेलमध्ये राजकीय भूकंप आला असून,  मनसेला खिंडार पडले आहे. पनवेल, उरणमधील मनसेच्या 100 पदाधिकाऱ्यांचा एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. रात्री उशिरा मलबार हिल येथील नंदनवन बंगल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला. मनसेचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, माजी खारघर शहर प्रमुख प्रसाद परब एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेत. उरण आणि पनवेलमधील मनसे, खारघरची पूर्ण टीम शिंदे गटात सामील झाली. रायगड जिल्ह्यातील अंतर्गत वादामुळे अनेकांनी मनसेला राम राम केला. एकनाथ शिंदे गटात पक्ष प्रवेशाचा ओघ सुरूच आहे.

Published on: Aug 02, 2022 09:22 PM