मनसेच्या दीपोत्सवात उद्धव ठाकरे म्हणाले की मराठी माणसाची एकजूट…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दादर शिवाजी पार्क येथील दीपोत्सवाचे उद्घाटन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मनसेच्या शिवाजी पार्क येथील दीपोत्सवाचे यंदा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी आपल्या धाकट्या भावाच्या या दीपोत्सव कार्यक्रमाला उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई आणि शिवसेनेची नेतेमंडळी आवर्जून उपस्थित होती.यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांच्या विनंतीनंतर एकत्र पोझ देत फोटोसेशन करु दिले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्वांना दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा आणि आजची दिवाळा ही वेगळी आहे. विशेष आहे. आणि मला खात्री आहे. मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजूटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. असेच सर्व जण आनंदात राहा, प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत रहा. परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो, ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ !
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

